आयटीआय झाल्यानंतर जास्त पगाराची नोकरी कशी मिळवावी? संपूर्ण माहिती मराठीत २०२६

 

प्रस्तावना - कौशल्यॅ म्हणजे भांडवल

नमस्कार मित्रांनो, मी आशिष जोशी. मागील  25 वर्षांपासून मी महाराष्ट्र शासनाच्या टेक्निकल ऐजुकेशन विभागात विद्यार्थांना कौशल्य शिकवणचे  काम करत आहे . तसेच मी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना अमरावती विभाग मध्ये विभागीय खजिनदार म्हणून काम करत आहे. या 25 वर्षात मी हजारो विद्यार्थी घडताना पाहिले आहेत.

कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉग, यूट्यूब चॅनल व वेबसाईटचा मुख्य उद्देश हाच आहे की ITI ला येणारे 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातून येतात. त्यांना घरच्या परिस्थितीमुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. पण माझ्या अनुभवावरून मी सांगतो - ITI चा विद्यार्थी हा इंजिनिअर पेक्षाही जास्त प्रॅक्टिकल काम करू शकतो.

आजच्या या लेखात मी तुम्हाला ITI नंतर जास्त पगाराची नोकरी कशी मिळवायची याबद्दल संपूर्ण माहिती मराठीत देणार आहे. हा लेख शेवटपर्यंत वाचा, तुमचे आयुष्य बदलून जाईल.

उद्योग क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मागणी असलेले 5 ट्रेड्स कोणते?

अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाटते की फक्त 2-3 ट्रेडलाच नोकरी आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. ITI मध्ये असा कोणताही ट्रेड नाही ज्याला नोकरी नाही. प्रत्येक ट्रेडचे स्वतःचे महत्त्व आहे. तरीही आजच्या बाजारपेठेनुसार 5 ट्रेडला सर्वात जास्त मागणी आहे.

१. इलेक्ट्रिशियन (Electrician) - कायम मागणी असलेला ट्रेड

आज EV गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक वाहने, सोलर पॅनल आणि स्मार्ट होम तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिशियनला प्रचंड मागणी आहे. प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक कंपनीत इलेक्ट्रिशियन लागतोच. सरकारी नोकरीत महावितरण, महापारेषण, रेल्वे, PWD मध्ये संधी आहे. खाजगी कंपनीत सुरुवातीचा पगार 20000 ते 40000 मिळतो. मी माझ्या अनेक विद्यार्थ्यांना पाहिले आहे जे आज दुबई मध्ये 80000 पगार घेत आहेत.

Pro Tip: ITI इलेक्ट्रिशियन सोबत तुम्ही जर सोलर इन्स्टॉलेशनचा किंवा वायरमनचा एक छोटा 3 महिन्याचा कोर्स केला तर तुमच्या पगारात 10000 ते 15000 ने वाढ नक्कीच होईल. कारण आज सोलरचे युग आहे.

२. फिटर (Fitter) - उद्योगाचा कणा

फिटरला उद्योगाचा कणा म्हणतात. कोणतीही मोठी कंपनी फिटर शिवाय चालू शकत नाही. मशीन जोडणी, देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रत्येक कंपनीत फिटर लागतो. टाटा मोटर्स, महिंद्रा, बजाज अशा मोठ्या कंपन्यांमध्ये फिटरला कायम संधी असते. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी ITI फिटर नंतर CNC ऑपरेटरचा कोर्स केला आणि लगेच 30000 ते 35000 पगाराची नोकरी मिळवली. फिटरने जर ड्रॉइंग वाचायला शिकले तर त्याला सुपरवायझर होता येते.

३. COPA आणि ड्राफ्ट्समन सिव्हिल - ऑफिस जॉब पाहिजे त्यांच्यासाठी

ज्यांना मशीनवर, तेल-पाण्यात काम नकोय, ज्यांना ऑफिसमध्ये AC मध्ये काम पाहिजे, त्यांच्यासाठी COPA (Computer Operator and Programming Assistant) हा उत्तम ट्रेड आहे. कॉम्प्युटरचे ज्ञान असल्यावर तुम्ही MNC मध्ये, बँकेत, शासकीय कार्यालयात डेटा ऑपरेटर म्हणून काम करू शकता. तसेच ड्राफ्ट्समन सिव्हिल केलेल्या विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्रात AutoCAD ऑपरेटर म्हणून 25000 ते 40000 पगार सहज मिळतो.

४. वेल्डर आणि टर्नर - परदेशात जास्त मागणी

जर तुम्हाला परदेशात जायचे असेल, Gulf मध्ये जायचे असेल तर वेल्डर आणि टर्नर या ट्रेडला सर्वात जास्त मागणी आहे. 6G वेल्डरला Gulf मध्ये 1 लाखापर्यंत पगार मिळतो. फक्त तुम्हाला वेल्डिंगमध्ये परफेक्ट व्हावे लागेल.

ITI नंतर अप्रेंटिसशिप करणे गरजेचे आहे का? माझे मत

हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. मला रोज 20-25 फोन येतात - सर अप्रेंटिसशिप करू का? माझे स्पष्ट मत आहे - बंधनकारक नाही, पण करिअरसाठी अत्यंत फायदेशीर आहे. का ते सांगतो.

अप्रेंटिसशिप केल्यावर तुम्हाला NAC म्हणजे National Apprenticeship Certificate मिळते. हे सर्टिफिकेट रेल्वे, ISRO, BHEL, HAL, ऑर्डनन्स फॅक्टरी सारख्या मोठ्या सरकारी नोकऱ्यांसाठी अनिवार्य असते. तसेच 1 वर्षाचा प्रत्यक्ष कंपनीत काम केल्याचा अनुभव मिळतो. कंपनी तुम्हाला 7700 ते 12000 पर्यंत स्टायपेंड पण देते. त्यामुळे माझा सल्ला आहे, ITI झाली की लगेच अप्रेंटिसशिप करा. एक वर्ष वाया जात नाही, तर तुमचे करिअर बनते.

ITI विद्यार्थ्यांचा पगार कसा वाढेल? माझे 5 अनुभवसिद्ध उपाय

मी माझ्या 25 वर्षाच्या निदेशक पदाच्या अनुभवातून 5 गोष्टी सांगतो ज्या केल्याने तुमचा पगार नक्की 100% वाढेल:

१. एक Extra स्किल शिका: फक्त ITI च्या सर्टिफिकेटवर थांबू नका. फिटर असाल तर CNC/VMC मशीन शिका, इलेक्ट्रिशियन असाल तर सोलर किंवा BMS शिका. एका जास्त स्किलमुळे 15000 पगार वाढतो.

२. इंग्रजी संभाषण आणि सॉफ्ट स्किल सुधारा: इंटरव्ह्यू मध्ये 90% विद्यार्थी तांत्रिक ज्ञान असूनही इंग्रजीमुळे आणि आत्मविश्वासाअभावी नापास होतात. रोज 10 इंग्रजी शब्द आणि स्वतःची ओळख इंग्रजीत सांगायला शिका.

३. अप्रेंटिसशिप नक्की करा: पहिल्या पगाराकडे बघू नका, अनुभवाकडे बघा. मोठ्या कंपनीत अप्रेंटिसशिप केली तर त्याच कंपनीत परमनंट होण्याची संधी 80% असते.

४. NSDC आणि Skill India प्रमाणपत्र काढा: हे प्रमाणपत्र परदेशात नोकरीसाठी खूप महत्त्वाचे आहे. Gulf मध्ये याच प्रमाणपत्रावर 80,000 पर्यंत पगार मिळतो.

५. मुलाखतीची तयारी करा: तांत्रिक ज्ञानासोबत आत्मविश्वास, कपडे, बोलण्याची पद्धत महत्त्वाची आहे. यूट्यूबवर इंटरव्ह्यूचे व्हिडिओ बघा.

निष्कर्ष - ITI म्हणजे काय?

मित्रांनो, शेवटी एकच सांगेन, ITI हा शेवट नाही तर एक चांगली सुरुवात आहे. आजच्या काळात डिग्री घेऊन अनेक मुले बेरोजगार आहेत, पण ITI झालेला मुलगा कधीही बेरोजगार राहत नाही. कारण त्याच्या हातात कौशल्य असते. मी डोळ्यासमोर अनेक विद्यार्थी शून्यातून मोठे झालेले पाहिले आहेत, ज्यांनी स्वतःचा व्यवसाय टाकला आहे आणि आज 10 मुलांना रोजगार देत आहेत.

योग्य कौशल्य, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत मिळाली तर तुम्हीही महिन्याला 80,000 ते 1 लाखापर्यंत पगार नक्की घेऊ शकता. चिकाटी सोडू नका, स्किल शिका आणि मोठे व्हा.

तुम्हाला कोणत्या ट्रेडची संपूर्ण माहिती हवी आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा, मी त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवेन.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. ITI नंतर सरकारी नोकरीसाठी वयाची अट किती असते?

साधारण 18 ते 28 वर्षांपर्यंत. SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे सूट असते.

२. अप्रेंटिसशिपला स्टायपेंड किती मिळतो 2026 मध्ये?

सरकारी नियमानुसार 7700 ते 12,000 रुपये महिना मिळतो. चांगल्या प्रायव्हेट कंपनीत 15,000 पर्यंत पण देते.

३. ITI नंतर डिप्लोमा कसा करायचा?

ITI नंतर तुम्हाला थेट पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला (Direct Second Year) प्रवेश मिळतो. 2 वर्षात डिप्लोमा होतो आणि पगार दुप्पट होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ITI Electrician/Wireman साठी MSEB MahaVitaran मध्ये कोणती पदे निघतात? पगार, पात्रता संपूर्ण माहिती 2026

माझ नव Instagram Page सुरू झाल Kaushalya Career Guide

ITI नंतर Apprenticeship गरजेची आहे का? फॉर्म कसा व कुठे भरायचा? संपूर्ण माहिती