पोस्ट्स

Central Railway Apprentice Bharti 2026: 2861 जागा, परीक्षा नाही, ₹9600 Stipend - संपूर्ण माहिती

इमेज
  Central Railway Act Apprentice 2026 मध्ये 2861 जागांची भरती. पात्रता 10वी + ITI, वय 15-24, परीक्षा नाही, फक्त Merit. Nagpur, Mumbai, Pune,Bhusawal & Solapur Cluster. शेवटची तारीख 2 डिसेंबर 2026. फॉर्म कसा भरायचा ते वाचा. *Central Railway Apprentice Bharti 2026 - ITI वाल्यांसाठी सुवर्णसंधी* ITI करून घरी बसला आहात का? नोकरीसाठी भटकताय का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Central Railway ने *Act Apprentice 2026* साठी *2861 जागांची* मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात *कोणतीही लेखी परीक्षा नाही, कोणताही इंटरव्ह्यू नाही.* निवड फक्त तुमच्या 10वी आणि ITI च्या मार्क्सवर होणार आहे. जर तुम्ही 10वी + ITI पास असाल, तर ही संधी अजिबात सोडू नका. *या Blog मध्ये काय वाचणार?* 1. भरतीची थोडक्यात माहिती 2. Cluster नुसार जागा 3. पात्रता आणि वय 4. Stipend आणि फायदे 5. फॉर्म कसा भरायचा? 6. लागणारी कागदपत्रे 7. फॉर्म Reject होण्याची 5 कारणे 1. Central Railway Apprentice 2026 - थोडक्यात माहिती माहिती तपशील भरतीचे नाव Central Railway Act Apprentice 2026 एकूण जागा 2861...

ITI नंतर पुढे काय? शिक्षणाच्या 8 जबरदस्त संधी - Diploma ते Degree पर्यंत पूर्ण माहिती

इमेज
प्रस्तावना:          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक  स्वागत आहे. आजचा प्रश्न प्रत्येक ITI विद्यार्थ्याला पडतो - ITI नंतर पुढे काय करायचे ? कोणते शिक्षण घ्यायचे?          औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय कडे पाहण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन  होता म्हणजे आयटीआय  केल्यानंतर शिक्षणाला पूर्णविराम व कौशल्याच्या जोरावर  नोकरीला लागणे इतकाच उद्देश झाला होता. परंतु सध्या ही परिस्थिती  बदलताना दिसत आहे व  मला असे वाटते आहे की आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्यांचा आयटीआयकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा जेणेकरून त्यांना प्रगतीची सर्व दरवाजे आपोआप उघडतील आणि पुढील पिढीला एक आदर्श निर्माण होईल कारण  माझा ठाम विश्वास आहे की आयटीआयचा विद्यार्थी कुठेही कमी नाही. परंतु त्याने स्वतःही सतर्क राहून पुढील शिक्षणाकडे वळावे व करिअरच्या नवनविन संधी पदाक्रांत करावे मी परत एकदा माझं नेहमीच वाक्य  सांगतोय आयटीआय चा विद्यार्थी हा नक्कीच इंजिनिअरिंगच्या  ...

ITI नंतर PWD Contractor कसा बनायचा? सरकारी टेंडर मिळवा, महिन्याला लाखो कमवा - पूर्ण माहिती

इमेज
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आजचा टॉपिक प्रत्येक ITI झालेल्या मुलाचं नशीब बदलणारा आहे - ITI नंतर PWD Contractor कसा बनायचा? तुम्ही ITI Electrician, Fitter, Wireman किंवा Civil Draftsman असाल, तर सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना काढली आहे - बेरोजगार अभियंता / कंत्राटदार नोंदणी. ITI (Fitter, Electrician, Civil, इ.) पूर्ण झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासन Public Works Department (PWD) अंतर्गत शासकीय कंत्राटदार (Government Contractor) म्हणून नोंदणी करू शकता. PWD Contractor म्हणजे काय?* PWD म्हणजे Public Works Department - सार्वजनिक बांधकाम विभाग. महाराष्ट्रात रस्ते, सरकारी शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत इमारती, अंगणवाड्या ही सर्व बांधकामे PWD च करतं. आणि ही सर्व कामे PWD Contractor मार्फतच केली जातात. तुम्ही एकदा PWD Contractor झालात की तुम्हाला थेट सरकारी टेंडर भरता येतात. कोणत्याही दलालाची गरज नाही. ITI मुलांसाठी कोणता Class मिळतो?* PWD मध्ये Class 1 (सर्वात मोठा, करोडोची कामं) ते Class 8 (छोटी कामं) असे Class असतात. - *ITI धारकांसाठी...

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन काढा आणि मालक बना - ITI Electrician साठी पूर्ण प्रोसेस

इमेज
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहे तो म्हणजे  इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन काढा आणि मालक बना बऱ्याच मुलांना वाटतं - ITI झालं म्हणजे काम झालं. पण खरं Career आणि पैसा हा *Contractor License* मधेच आहे! ITI Electrician झालात पण अजूनही 12-15 हजाराच्या नोकरीवर आहात का? तर मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी म्हणजे *Electrical Contractor License*. आज महाराष्ट्रात ज्या ITI मुलांकडे हे लायसन्स आहे, ते महिन्याला सहज  ₹1 लाख कमवत आहेत. कसं? चला सविस्तर बघू. कायद्याने बंधनकारक आहे:* Indian Electricity Act 1956 नुसार, लायसन्स शिवाय कोणत्याही बिल्डिंगचं, फॅक्टरीचं, घराचं वायरिंग करणं बेकायदेशीर आहे. पकडलात तर ₹10,000 पर्यंत दंड आहे. हीच खरी आय.टी.आय विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. *Contractor License म्हणजे काय आणि ते गरजेचं का आहे?* सोप्या भाषेत सांगायचं तर, हे लायसन्स म्हणजे सरकारने दिलेला परवाना आहे की "हा माणूस अधिकृत Electrician आहे आणि तो कोणत्याही घराचे, दुकानाचे, फॅक्टरीचे वायरिंग करू शक...

ITI नंतर Railway मध्ये कोणते Jobs, ते कसे मिळवायचे? ALP, Technician साठी 100% Guide

इमेज
प्रस्तावना                 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कौशल्य म्हणजे भांडवल ह्या आपल्या ब्लॉगवर आपले  मनःपूर्वक स्वागत आज अत्यंत महत्त्वाचा जे आयटीआय विद्यार्थी स्वप्न असतं तो विषय आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय ITI केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं - Railway मध्ये नोकरी लागावी! पण बऱ्याच मुलांना नेमकी माहितीच नसते की Railway मध्ये ITI वाल्यांसाठी कोणत्या पोस्ट असतात आणि तयारी कशी करायची.                 आजच्या पोस्ट मध्ये आपण ITI विद्यार्थ्यांनी Railway मध्ये Job लागण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे, याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. Railway मध्ये ITI साठी कोणत्या नोकऱ्या असतात?*                 ITI (Industrial Train5ing Institute) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतीय रेल्वेत (Indian Railways) करिअरच्या अनेक सुवर्णसंधी उपलब्ध असतात. रेल्वे हा देशातील असा एक सर्वात मोठा विभाग आहे जिथे दरवर्षी ITI धाaरकांसाsठी हजारो जागांची भरती निघते.   ...

ITI नंतर Apprenticeship गरजेची आहे का? फॉर्म कसा व कुठे भरायचा? संपूर्ण माहिती

इमेज
  1. प्रस्तावना:         नमस्कार मित्रांनो,  कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत जिथे आपण आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण आणि योग्य माहिती पोहोचावी याचा सदैव प्रयत्न करत असतो आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच विषय घेतलेला आहे तो म्हणजे आयटीआय नंतर (Apprenticeship) शिकाऊ उमेदवारी गरजेची आहे का तसेच त्यासाठीचा नोंदणी अर्ज कोठे भरावा लागतो तसेच कागदपत्रे कोणते लागतात . यासाठी विद्यार्थ्यांना मदत तसेच मार्गदर्शन कोठे मिळेल. अर्ज online सादर करण्यासाठी website कोणती.           ITI झाल्यावर सगळ्यांना एकच प्रश्न पडतो - आता Apprenticeship करावी का? चला तर मग आज सविस्तर बघूया. मित्रांनो, Apprenticeship हीच तुमच्या करिअरची पहिली पायरी आहे, हिला हलक्यात घेऊ नका! 2.  ITI नंतर Apprenticeship गरजेची आहे का?     होय, 100% गरजेची आहे!         होय, आयटीआय (ITI) नंतर अप्रेंटिसशिप (Apprenticeship) करणे अत्यंत गरजेचे आणि फायदेशीर आहे. आ...

AI च्या युगात ITI Electrician चे भविष्य - संपूर्ण माहिती २०२६

इमेज
⁷ *प्रस्तावना:* मित्रांनो, आजकाल सर्वत्र AI म्हणजे Artificial Intelligence ची चर्चा आहे. अनेकांना वाटतंय की AI आल्यामुळे ITI Electrician सारख्या हाताने काम करणाऱ्या नोकऱ्या संपतील. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे! उलट AI च्या युगात ITI Electrician ला मागणी 10 पट वाढणार आहे. कसं ते आज आपण सविस्तर पाहूया. *१. AI ITI Electrician ची नोकरी घेणार का?* अजिबात नाही. AI फक्त कॉम्प्युटरवरचं काम करू शकतं, पण वायर जोडणं, मोटर दुरुस्त करणं, घरातलं वायरिंग करणं हे काम AI करू शकत नाही. त्यासाठी माणसच लागतो. पण AI मुळे Electrician चं काम सोपं आणि जास्त पगाराचं होणार आहे. उदाहरण: आधी फॉल्ट शोधायला तास लागत होता, आता AI मीटर सांगतं की फॉल्ट कुठे आहे. *२. AI युगात Electrician ला कोणती नवीन कौशल्ये लागतील?* २०२६ मध्ये फक्त जुना Electrician राहून चालणार नाही. तुम्हाला हे 5 नवीन कौशल्य शिकावंच लागेल: a)  Solar Panel Installation :   सरकार घरोघरी सोलर लावत आहे. सोलर फिटरला महिना 40,000 ते 60,000 पगार आहे. *b) EV (Electric Vehicle) Charging Station: * इलेक्ट्रिक गाड्यांचं चार्जिंग स्टेशन बसवणं हे सर्व...