ITI नंतर Railway मध्ये कोणते Jobs, ते कसे मिळवायचे? ALP, Technician साठी 100% Guide
प्रस्तावना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कौशल्य म्हणजे भांडवल ह्या आपल्या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत आज अत्यंत महत्त्वाचा जे आयटीआय विद्यार्थी स्वप्न असतं तो विषय आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय
ITI केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं - Railway मध्ये नोकरी लागावी! पण बऱ्याच मुलांना नेमकी माहितीच नसते की Railway मध्ये ITI वाल्यांसाठी कोणत्या पोस्ट असतात आणि तयारी कशी करायची.
आजच्या पोस्ट मध्ये आपण ITI विद्यार्थ्यांनी Railway मध्ये Job लागण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे, याची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Railway मध्ये ITI साठी कोणत्या नोकऱ्या असतात?*
ITI (Industrial Train5ing Institute) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतीय रेल्वेत (Indian Railways) करिअरच्या अनेक सुवर्णसंधी उपलब्ध असतात. रेल्वे हा देशातील असा एक सर्वात मोठा विभाग आहे जिथे दरवर्षी ITI धाaरकांसाsठी हजारो जागांची भरती निघते.
ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रेल्वेमध्ये कोणत्या संधी उपलब्ध असतात, याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे Railway मध्ये ITI पास विद्यार्थ्यांसाठी 4 मुख्य पोस्ट असतात:
*RRB ALP (Assistant Loco Pilot) -रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर ही सगळ्यात चांगली पोस्ट आहे.
काम: रेल्वे इंजिन ड्रायव्हरचा सहाय्यक म्हणून काम करणे.
पगार- 40,000+ असतो.
शिक्षण- ITI + 10th पास असणारे यासाठी पात्र असतात.
पगार- 40,000+ असतो.
शिक्षण- ITI + 10th पास असणारे यासाठी पात्र असतात.
RRB Technician GradeI आणि Grade-III:
रेल्वेच्या विविध वर्कशॉप आणि शेडमध्ये टेक्निशियन म्हणून भरती केली जाते. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, डिझेल मेकॅनिक यांसारख्या ट्रेड साठी हजारो जागा निघतात. या ट्रेड्सना मोठी मागणी असते.
काम: रेल्वेचे वेगवेगळे तांत्रिक विभाग जसे की इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिग्नल आणि टेलिकॉम यामध्ये दुरुस्ती आणि देखभालीची कामे करणे.
- *RRB Group D:*
यामध्ये Track Maintainer, पॉइंट्समन,Helper या पोस्ट असतात. यामध्ये सगळ्यात जास्त Vacancy असते.
काम: ट्रॅक मेंटेनर (Track Maintainer), हेल्पर (Helper), पॉईंट्समन (Pointsman) इत्यादी तांत्रिक स्वरूपाची कामे.
रेल्वे अप्रेंटिसशिप (Railway Apprenticeship)
ITI पास झाल्यानंतर रेल्वेमधून १ वर्षाची Apprenticeship Training करणे हा एक उत्तम मार्ग आहे.
काम: रेल्वेच्या विविध वर्कशॉपमध्ये १ वर्षाचे पेड ट्रेनिंग (Stipend सह) दिले जाते. हे ट्रेनिंग पूर्ण केल्यास भविष्यातील रेल्वेच्या ग्रुप डी भरतीत २०% आरक्षण (कोटा) मिळतो.
पात्रता: १० वी उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह) + संबंधित ट्रेडमध्ये ITI.
• निवड पद्धत: यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नसते. १०वी आणि ITI च्या गुणांच्या गुणवत्तेवर (Merit List) थेट निवड केली जाते.
• मोठा फायदा: जे विद्यार्थी रेल्वेतून अप्रेंटिसशिप पूर्ण करतात, त्यांना रेल्वेच्या Group D (Level-1) च्या थेट भरतीमध्ये २०% जागा आरक्षित (Quota) मिळतात, ज्यामुळे सरकारी नोकरी मिळणे खूप सोपे होते.
[Railway स्वतः ITI वाल्यांना Apprentice करून घेते आणि नंतर त्यांनाच 20% आरक्षण देते.]
पात्रता काय लागते?*
शिक्षण: 10वी + ITI (NCVT/SCVT). तुमचा Trade कोणताही असो - Fitter, Electrician, Turner, Machinist, COPA सगळे चालतात. पण Electrician आणि Fitter ला सर्वात जास्त जागा असतात.
वय: • अप्रेंटिससाठी: १५ ते २४ वर्षे.
• कायमस्वरूपी नोकरीसाठी (ALP/Technician): १८ ते ३0/३३ वर्षे.
• (सरकारी नियमांनुसार OBC उमेदवारांना ३ वर्षे आणि SC/ST उमेदवारांना ५ वर्षे वयात सूट मिळते).
निवड प्रक्रिया (Selection Process)
कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना RRB (Railwayy Recruitment Board) द्वारे आयोजित केली जाणारी परीक्षा द्यावी लागते:
परीक्षेचा Pattern कसा असतो?*
CBT (Computer Based Test): संगणकावर आधारित लेखी परीक्षा.
-CBT 1 (पहिली परीक्षा):* यामध्ये Maths, Reasoning, General Science आणि GK/GS असे 75 प्रश्न असतात. हा पेपर सर्वांसाठी सारखाच असतो.
-CBT 2 (दुसरी परीक्षा):* यामध्ये दोन भाग असतात. Part A - Maths, Reasoning, Science आणि Part B - तुमचा ITI Trade. Part B फक्त Qualifying असतो.
हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ITI ची मुले इथेच चुकतातलक्षात ठेवा - 50% पेपर हा Non-Technical असतो. फक्त Trade वाचून Railway मध्ये Job लागत नाही!
Medical Exam & Document Verification: वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी.
वैद्यकीय तपासणी (Medical Test): रेल्वेच्या निकषांनुसार डोळे आणि शारीरिक फिटनेस तपासला जातो.
कागदपत्र पडताळणी (Document Verification)
ITI विद्यार्थ्यांनी कशावर जास्त लक्ष द्यावे? (हा मुद्दा सर्वात महत्वाचा)*
Trade Theory पक्का करा:* तुमच्या Trade चे पुस्तक रोज 1 तास वाचा. Electrician असेल तर Motor, Wiring, Transformer हे विषय पक्के करा.
Maths आणि Reasoning रोज करा:* Railway मध्ये Time and Work, Percentage, Railway चे प्रश्न हमखास विचारतात. रोज 1 तास Maths ला द्या.
Apprenticeship नक्की करा:* बऱ्याच मुलांना हे माहिती नाही की Railway मध्ये ITI Apprenticeship केलेल्यांना 20% जागा राखीव असतात. त्यामुळे ITI नंतर Apprenticeship नक्की करा. [यावर मी सविस्तर पोस्ट लिहिली आहे ती इथे वाचा - ITI Apprenticeship म्हणजे काय? https://www.kaushalmhanjebhandwal.in/2026/10/iti-apprenticeship.html ]
जुने पेपर सोडवा:* RRB ALP 2018 आणि 2024 चे पेपर तुम्ही सोडवले तर 40% प्रश्न तसेच येतात.
तयारी कधीपासून सुरू करावी?
ITI च्या दुसऱ्या वर्षापासूनच तयारी सुरू करा. ITI संपल्यावर तयारी करायला गेलात तर एक वर्ष वाया जाईल. रोज फक्त 2 तास - 1 तास Trade आणि 1 तास Maths - एवढं जरी केलं तरी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात Railway मध्ये लागू शकता.
मित्रांनो, Railway मध्ये नोकरी मिळवणे अवघड नाही, पण योग्य दिशा महत्वाची आहे. फक्त ITI पास होऊन उपयोग नाही, तर त्यासोबत योग्य तयारी हवी.
तुम्हाला Railway भरतीबद्दल अजून काही शंका असेल तर Comment मध्ये नक्की विचारा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा