आयटीआय झाल्यानंतर जास्त पगाराची नोकरी कशी मिळवावी? संपूर्ण माहिती मराठीत २०२६
प्रस्तावना - कौशल्यॅ म्हणजे भांडवल नमस्कार मित्रांनो, मी आशिष जोशी. मागील 25 वर्षांपासून मी महाराष्ट्र शासनाच्या टेक्निकल ऐजुकेशन विभागात विद्यार्थांना कौशल्य शिकवणचे काम करत आहे . तसेच मी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना अमरावती विभाग मध्ये विभागीय खजिनदार म्हणून काम करत आहे. या 25 वर्षात मी हजारो विद्यार्थी घडताना पाहिले आहेत. कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉग, यूट्यूब चॅनल व वेबसाईटचा मुख्य उद्देश हाच आहे की ITI ला येणारे 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातून येतात. त्यांना घरच्या परिस्थितीमुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. पण माझ्या अनुभवावरून मी सांगतो - ITI चा विद्यार्थी हा इंजिनिअर पेक्षाही जास्त प्रॅक्टिकल काम करू शकतो. आजच्या या लेखात मी तुम्हाला ITI नंतर जास्त पगाराची नोकरी कशी मिळवायची याबद्दल संपूर्ण माहिती मराठीत देणार आहे. हा लेख शेवटपर्यंत वाचा, तुमचे आयुष्य बदलून जाईल. उद्योग क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मागणी असलेले 5 ट्रेड्स कोणते? अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाटते की फक्त 2-3 ट्रेड...