*AI च्या युगात ITI च्या कोणत्या 5 ट्रेडला सर्वात जास्त मागणी असेल*? (2026 ते 2030)

 



AI च्या युगात ITI च्या कोणत्या ट्रेडला जास्त मागणी असेल?*


मित्रांनो, आजकाल सगळीकडे एकच चर्चा आहे - AI मुळे नोकऱ्या जातील का? पण ITI केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AI मुळे काही नोकऱ्या जातील, पण आय.टी.आय  कौशल्य प्राप्त मनुष्यबळा नक्कीच सुरक्षित आहे कारण  डिझाइन इस्च्टिमेट ही सुपरवायझर कामे AI निसंकोच करेल. परंतु प्रत्यक्षात काम हे आय.टी.आय प्रशिक्षणाथ्या शिवाय होने शक्यच नाही जसे वायरींग किंवा फर्निचर डिझाइन व इस्टिमेट AI काढेल पण प्रत्यक्षात कार्य मनुष्यबळा शिवाय शक्य नाही. ITI च्या काही ट्रेड्सना तर सोन्याचे दिवस येणार आहेत!


चला बघूया कोणते आहेत ते 5 ट्रेड.


*1. इलेक्ट्रिशियन (Electrician) - King of AI Era*

AI चा सगळा खेळ वीज आणि Data वर चालतो. EV गाड्या, सोलर पॅनल, AI Data Center - सगळीकडे इलेक्ट्रिशियन लागणारच. या ट्रेडला कधीच मंदी नाही.


*2. फिटर (Fitter) + रोबोटिक्स*

भविष्यात कंपन्या रोबोट वापरणार, पण तो रोबोट बसवणार कोण? आणि बिघडला तर दुरुस्त करणार कोण? फिटर! आता फिटरने रोबोटिक्स आणि Automation ची जोड दिली तर पगार 50,000 च्या वर जाईल.


*3. COPA / IT आणि AI*

हा ट्रेड तर AI ने बनवलाच आहे. Computer Operator ला आता AI Tools, Data Entry, Cyber Security येत असेल तर परदेशात सुद्धा मागणी आहे.


*4. मेकॅनिक (Motor Vehicle / EV)*

पेट्रोलच्या गाड्या जाऊन आता EV येत आहेत. EV मोटर, बॅटरी दुरुस्त करणारा मेकॅनिक मिळणं खूप कठीण आहे. ज्याने EV शिकलं, तोच पुढचा लखपती.


*5. वेल्डर (Advanced Welder)*

AI वेल्डिंग रोबोटला ऑपरेट करण्यासाठी सुद्धा माणूस लागतो. Argon आणि Laser Welding येणाऱ्या वेल्डरला आजच दुबईमध्ये 1 लाख पगार आहे.


*निष्कर्ष:*

मित्रांनो, लक्षात ठेवा - AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI वापरणारा माणूस तुमची नोकरी नक्की घेईल. त्यामुळे ITI सोबत एक तरी AI स्किल शिका.


तुम्हाला कोणत्या ट्रेड बद्दल माहिती हवी आहे? खाली Comment करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ITI Electrician/Wireman साठी MSEB MahaVitaran मध्ये कोणती पदे निघतात? पगार, पात्रता संपूर्ण माहिती 2026

माझ नव Instagram Page सुरू झाल Kaushalya Career Guide

ITI नंतर Apprenticeship गरजेची आहे का? फॉर्म कसा व कुठे भरायचा? संपूर्ण माहिती